Anuradha Vipat
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बेड रेस्टवर आहे.
५ ऑक्टोबर रोजी रकुल प्रीत सिंह जीममध्ये व्यायाम करत होती.
व्यायाम करताना तिने एक छोटीशी चूक केली ज्यामुळे तिची पाठ दुखू लागली.
अशावेळी डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता
पण कामाच्या कमिटमेंट्समुळे तिने विश्रांती घेण्याऐवजी कामाला जायला सुरुवात केली. त्यामुळे तिचा त्रास वाढला
आता यानंतर डॉक्टरांनी तिला आठवडाभर बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे
आता रकुलची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगितले जात आहे