Saisimran Ghashi
केळी खाल्ल्याने वजन वाढते का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण उत्तर इतकं सोपं नाही.
केळ्यात भरपूर कॅलरीज असतात. पण फक्त कॅलरीज वाढणे म्हणजेच वजन वाढणे,असे नाही.
केळ्यात भरपूर फायबर असते. या फायबरमुळे जास्त वेळासाठी पोट भरून राहते आणि अनावश्यक खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखते.
केळ्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विटामिन B6 असते. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
वजन वाढणे हा केवळ कॅलरीजचा प्रश्न नाही. आपण कधी आणि किती प्रमाणात केळी खातो, यावरही परिणाम होतो.
वर्कआउट दरम्यान केळी खाल्ली तर एनर्जी मिळते. पण फक्त बसून केळी खाल्ली तर वजन वाढण्याची शक्यता असते.
फक्त केळी खाणे हे एक संपूर्ण आहार नाही. त्यामुळे संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.
केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते, हे तुमच्या संपूर्ण आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.