Saisimran Ghashi
अनेकांना केस गळतीची समस्या असते,केस वाढवायचे असतात. अश्यात प्रश्न असतो कांद्याच्या तेलाने खरोखर केस वाढतात काय?
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कांद्याचे तेल केसांसाठी उपयुक्त आहे की नाही.
कांद्याच्या तेलात असलेले सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांची वाढ प्रेरित करतात.
कांद्याच्या तेलातील बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म टाळूच्या संसर्गाला प्रतिबंध करतात आणि केस गळती कमी करतात.
नियमित वापराने कांद्याचे तेल केसांना मजबूत बनवून त्याला घनदाट बनवते.
कांद्याचे तेल केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चराइज करते आणि त्यांना मुलायम बनवते.
कांद्याचे तेल कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना पुनर्जीवित करते.
कांद्याचे तेल घरच्याघरी सहजपणे तयार करता येते किंवा बाजारातही उपलब्ध आहे. पण खरेदी करताना बाजारातील किंवा फसव्या ऑनलाइन ब्रॅंडपासून सावध रहा.
कांद्याच्या तेलाचे नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादींच्या सोबतही वापर करता येतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.