Saisimran Ghashi
शरीराला तंदुरुस्त आणि आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज चालणे महत्त्वाचे असते असे म्हटले जाते.
सकाळीच मॉर्निंग वॉक केल्याने आपणा चरण पासून दूर राहतो आणि मन ही प्रसन्न राहते.
पण काही लोकांना असं वाटतं की रोज चालल्याने गुडघे कमकुवत होतात जाणून घेऊया एक्सपर्ट काय सांगतात.
जर गुडघ्याला दुखापत किंवा अपघात झाला असेल तर गुडघ्यांची काळजी घेणे गरजेचे असते.
अशा परिस्थितीमध्ये लांब अंतरापर्यंत वॉक करणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे कमी अंतरावर चालणे व्यायाम करणे फायद्याचे आहे.
वॉकिंग केल्याने मन आणि बुद्धी प्रसन्न राहते आणि आजारपण लांब राहते. बीपी ची समस्या देखील रोज चालल्याने कमी होते.
रोज दहा ते पंधरा मिनिट चालण्यापासून तुम्ही दिवसाच्या वॉकिंगची सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता.
तज्ञांच्या मते,रोज चालल्याने गुडघ्यांना कोणतेच नुकसान होत नाही तर तुम्ही तंदुरुस्त राहता.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.