दह्यासोबत चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नका, होईल मोठं नुकसान

साक्षी राऊत

दही आरोग्यासाठी चांगले असते. यात असलेले बॅक्टेरिया डायजेशनसाठी उपयोगी असतात. मात्र काही खाण्याचे पदार्थ असे आहेत जे चुकूनही दह्यासोबत खाऊ नये.

Combination Of Curd

दूध आणि दही

दूध आणि दही एकत्र घेतल्यास अॅसिडिटी, ब्लोटिंग आणि गॅस सारखी समस्या होऊ शकते. त्यामुळे दूध आणि दही हे काँबिनेशन शरीराला नुकसान पोहोचवू शकतं.

Combination Of Curd

फिश आणि दही

फिशसोबत कधीही दह्याचे काँबिनेशन करू नये. यांना एकत्र खाल्ल्याने गॅस्ट्रोइन्टेस्टायनल समस्या उद्भवू शकतात. मासे दह्यासोबत खाल्ल्यास त्यातील प्रोटीन व्यवस्थित डायजेशन होत नाही.

Combination Of Curd

चीज आणि दही

बरेच लोक दह्याच्या डिशमध्ये चिज टाकतात. त्यामुळे बॉडी आणि डायजेशनच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Combination Of Curd

ऑयली फूड आणि दही

आलू पराठे आणि दही खायला टेस्टी वाटते. मात्र हे सोबत खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. दह्यासोबत कुठलेही ऑयली फूड खाल्ल्याने डायजेशन प्रोसेस स्लो होते. त्यामुळे संपूर्ण दिवस सुस्तपणा जाणवतो.

Combination Of Curd

केळी आणि दही

केळीसोबत दह्याचे कॉम्बिनेशन शरीराला नुकसान पोहोचवते. केळी खाल्ल्यानंतर दही खायचे झाल्यास दोन तासांनी खावे.

Combination Of Curd

खजूर आणि दही

खजूरसोबत दही खाऊ नये. यांचे सेवन एकत्र केल्यास पोट खराब होण्याची शक्यता असते.

Combination Of Curd

आंबट फळे आणि दही

आंबट फळे आणि दही यांचे एकत्र काम्बिनेशन खाल्ल्यास डायजेशनमध्ये समस्या निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Combination Of Curd