सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्याच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो.
आहारतज्ज्ञ डॉ. मनाली चौगुले सांगतात, 'हिवाळ्याच्या दिवसांत दूध सकाळच्या वेळेस प्यायल्यास गॅसेस, अपचन यांसारखे त्रास होतात.'
रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास दूध प्यावे
शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खावेत (उदा. खजूर, तेलबिया, तीळ, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया)
भूक जास्त लागते म्हणून कडधान्य, दुधाचे पदार्थ खावेत
बटाटा, लसूण, आले, मुळा, सुरण, रताळे, बीट आदी कंदमुळे खावीत.
पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेपू, मोहरीची भाजी, मुळ्याची पानांची भाजी खावी. तसेच लाल गाजर, नवलकोल अशा पौष्टिक भाज्या खाव्यात.
शेंगा, पडवळ, भोपळा यासारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.
शीतपेये घेऊ नयेत, फ्रीजमधील पदार्थ खाऊ नये. सुकामेव्यात बदाम, आक्रोड, काजू, मणुके खा.