साक्षी राऊत
बियर प्यायल्याने किडनी स्टोन होतो असा बऱ्याच लोकांचा समज आहे. मात्र हे किती खरं आहे ते जाणून घ्या.
बियमरमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. मात्र तुम्ही नियंत्रणात बियर प्यायल्यास बरेच हेल्थ बेनिफिट्स मिळतात. नियंत्रणात बियर प्यायल्यास अनेक प्रकारच्या कँसरच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता.
अनेक लोकांना असं वाटतं की बियर पिणे त्यांच्यासाठी फार हानिकारक आहे. मात्र असे नाही, योग्य प्रमाणात बियर पिल्यास मेटाबोलिझम पॉवर वाढतो.
बियर प्यायल्यास किडनी स्टोनवर काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो. तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावे लागू शकते, यामुळे तुमचा ३ मिमी पेक्षा लहान किडनी स्टोन काढता येऊ शकतो.
बियर प्यायल्यास हृदयाला धोका नाही, तर योग्य प्रमाणात बियरचे सेवन केल्यास कार्डियोव्हॅस्क्युलर हेल्थला फायदा होतो.
काही लोकांचा असा समज आहे की बियर प्यायल्याने हँगओव्हर होतो. मात्र हा फक्त एक समज आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारे बियरपेक्षा अल्कोहोलचे सेवन जास्त केल्यास तुम्हाला असे वाटू शकते.
हे लक्षात घ्या की गरजेपेक्षा जास्त प्रमाणात बियर पिऊ नका. त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका होतो.
डिस्क्लेमर - संबंधित लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.