सकाळ डिजिटल टीम
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते, म्हणूनच बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप पाहायला मिळते.
या वनस्पतीला तिच्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे जास्त पसंती दिली जाते. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास तुळशीचे पाणी प्यायल्यास, तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होऊ शकतात?
तुळशीच्या पानांमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. विशेषतः बदलत्या ऋतूमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो
जर आपल्या शरीरातील टॉक्सिन्स (Toxins) जास्त प्रमाणात वाढले, तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे पाणी प्यायला हवे.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोकाही कमी होतो.
जे लोक रोज रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पितात, त्यांना सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो. हा उपाय शतकानुशतके वापरला जात आहे.
तुळशीला मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते, हे सर्वांनाच माहीत नाही. त्याचे पाणी प्यायल्याने मन शांत राहते आणि तणाव, चिंता दूर होते.
जेव्हा तुम्ही काहीही न खाता तुळशीचे पाणी पितात, तेव्हा तुमची पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीपासून आरामही मिळतो.