प्लास्टिक बाटल्यांमधून पाणी पिताय? मग, सावधान! रक्तदाब, कर्करोगासह हृदयविकाराचा वाढतो धोका

सकाळ डिजिटल टीम

प्लास्टिकचा वापर खूप वाढला

आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. आपण बाजारातून आणलेला भाजीपाला, मसाला घरी प्लास्टिकच्या डब्यात ठेवत असतो.

Plastic Bottles Side Effects

प्लास्टिक बाटल्यांमधील पाणी आरोग्यासाठी हानिकारक

एवढेच नाही, तर काही लोक प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणीही पितात; पण प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते हे तुम्हाला माहितीये?

Plastic Bottles Side Effects

उच्च रक्तदाब वाढतो

न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, अलीकडील अभ्यासात असे दिसून आलेय की, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. ऑस्ट्रियातील डॅन्यूब प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये हा अभ्यास करण्यात आला.

Plastic Bottles Side Effects

प्लास्टिकमुळे रक्तदाब कसा वाढतो?

या अभ्यासात असं आढळून आलंय, की जेव्हा प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिले जाते, तेव्हा प्लास्टिकचे छोटे कण पाण्यात मिसळतात आणि त्यानंतर ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात.

Plastic Bottles Side Effects

मायक्रोप्लास्टिक्स

या प्लास्टिक कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात. ते आपल्या शरीरात रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि बराच वेळ रक्तात राहून आपले बीपी वाढवतात.

Plastic Bottles Side Effects

बाटल्यांमधून पाणी पिण्यास मनाई

विद्यापीठानं काही लोकांवर एक संशोधन केलं, ज्यामध्ये त्यांनी काही लोकांना आठवडाभर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्यास मनाई केली.

Plastic Bottles Side Effects

पाणी न पिणाऱ्यांचा रक्तदाब कमी होता

आठवडाभरानंतर असं आढळून आलं की, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणाऱ्यांपेक्षा बाटलीतील पाणी न पिणाऱ्यांचा रक्तदाब कमी होता.

Plastic Bottles Side Effects

कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका

काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञानं असा दावा केला होता, की एका आठवड्यात सुमारे 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरात प्रवेश करते. जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे बीपी तर वाढतोच, पण हृदयाच्या समस्या आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो.

Plastic Bottles Side Effects

काळी मिरी मधासोबत खाणे 'अमृत' का मानले जाते? अनेक रोगांवर ठरते रामबाण उपाय

Black Pepper and Honey Health Benefits | esakal
येथे क्लिक करा