सकाळ डिजिटल टीम
वजन वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स खातात हे तुम्हाला माहित असेल. पण योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात. असे कोणते ड्रायफ्रूट्स आहेत?
बदाम - रोज मध्यम प्रमाणात बदाम खाल्ल्याने शरीराला प्रोटीन आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्स मिळतात. बदामातल्या व्हिटमिन सीमुळे शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी होतं, त्यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं.
पिस्ता - पिस्ता खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. पचन सुधारते.
काजू - काजूमुळे बद्धकोष्ठता होत नाही. तसंच चयापचय क्रिया सुधारते.
खजूर - खजुरात फायबर असतं, त्यातल्या व्हिटमिन बी मुळे व्यायाम करताना स्टॅमिनाही वाढतो.
अक्रोड - अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अल्फा लिनोलिक अॅसिड असते. त्यामुळे अक्रोड खाल्ल्यास वजन कमी होण्यासोबतच हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.
मनुके - मनुके आयोडिनचा चांगला स्रोत आहेत. त्यात मीठ कमी असल्याने त्याचा वापर वजन कमी करण्यासाठी करता येऊ शकतो.
प्रुन्स - खजूर आणि आलुबुखारा या गटातल्या या मेव्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि सूजही कमी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.