Saisimran Ghashi
ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा खाणे शरीरासाठी,आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते.
सुक्या मेवा मध्ये काजू बदाम मनुके आणि पिस्ते त्याचबरोबर अनेक मेवे आहेत.
प्रत्येक जण आपल्या पसंतीनुसार शरीराच्या आवश्यकतेनुसार सुकामेवा खात असते पण ते खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?
रात्रभर ड्रायफ्रूट्स भिजत ठेवल्यानंतर खाणे का उत्तम असते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रात्रभर भिजवल्याने ड्रायफ्रूट्स फुगतात आणि मऊ होतात, ज्यामुळे ते पचायला सोपे होतात.
भिजवल्याने ड्रायफ्रूट्समधील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शरीरात शोषली जातात.
भिजवण्याच्या प्रक्रियेत ड्रायफ्रूट्समधील एंटी-न्यूट्रिएंट्स नष्ट होतात आणि पचनक्रिया सुधारते.
भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे आपल्याला दीर्घकाळासाठी ऊर्जा देते.
भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने उष्णता कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्याशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
कोणत्या शाकाहारी पदार्थामध्ये सर्वांत जास्त प्रोटीन असते?