Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘शो टाइम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे.
नुकतीचं इमरानने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या राय-बच्चनसंबंधित केलेल्या एका वक्तव्यामुळे पश्चाताप झाल्याचं जाहीर केलं आहे
तसंच ऐश्वर्याची माफी मागण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.
काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या पर्वाच्या एका भागात इमरान हाश्मी सहभागी झाला होता.
यावेळी एक खेळ खेळताना इमरानने ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं.
आता यावरुन ऐश्वर्या राय-बच्चनला वाईट वाटलं असेल तर मला तिची माफी मागायची आहे असं इमरान म्हणाला आहे.
पुढे इमरान म्हणाला, “मी स्वतः ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे.