Anuradha Vipat
आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिनेता इमरान हाश्मीने घरच्यांना त्याने अभिनय क्षेत्रात येऊ नये असे वाटत असल्याचे म्हटले आहे.
हाश्मीने म्हटले आहे की, मी अभिनेता होण्यात माझ्या आजीचा माझ्यावर मोठा प्रभाव होता.
पुढे हाश्मीने म्हटले आहे की , आजीला मी अभिनेता होईल की नाही यावर शंका होती.
पुढे हाश्मीने म्हटले आहे की , पण जेव्हा माझे काका महेश भट्ट यांनी विश्वास दाखवला आणि ‘फूटपाथ’ या चित्रपटातून मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
पहिल्या चित्रपटाच्या वेळी महेश भट्ट यांचे शब्द आजही आठवत असल्याचे त्याने म्हटले आहे.
इमरान हाश्मी म्हणतो, त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आपली सेवाभावी संस्था नाही; जर तू अभिनय करू शकला नाहीस आणि प्रेक्षकांना तुझा अभिनय आवडला नाही तर तुला चित्रपटातून काढून टाकेन.
गेल्या काही दिवसांपासून इमरान हाश्मी मल्लिका शेरावतबरोबरच्या तुटलेल्या मैत्रीमुळे चर्चेत होता.