Anuradha Vipat
मराठी कलाविश्वाचा सुपरस्टार म्हणून अंकुश चौधरीला ओळखलं जातं.
सध्या अंकुश स्टार प्रवाहच्या ‘सुपरस्टार जोडी नंबर १’ या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.
या शोच्या निमित्ताने अंकुशने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
अंकुश म्हणला, आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारची शिवी दिलेली नाही. याचं सगळ्यात मोठं कारण माझी आई आहे. तिने मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या, उत्तम संस्कार दिले आहेत
पुढे अंकूश म्हणाला “माझ्याकडे आलेल्या पहिल्या व्यावसायिक नाटकात शिवी होती म्हणून ते नाटक मी सोडलं होतं.
महेश मांजरेकरांचा चित्रपट लालबाग परळमध्ये सुद्धा शिव्या होत्या. त्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की, हा चित्रपट मी नाही करू शकणार असंही अंकूश म्हणाला