Anuradha Vipat
मधुबाला आजही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ती हे जग सोडून गेली
तिने केवळ दिलीप कुमार यांच्यावरील रागापायी दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केलं होतं.
मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होती पण त्यांच्याशी तिचं कधीच लग्न होऊ शकलं नाही.
मधुबालाने किशोर कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मधुबालाची तब्येत खराब असताना किशोर कुमार यांनी तिला प्रपोज केलं.
दिलीप कुमार यांच्याशी ९ वर्षाचं नातं तुटल्याने मधुबाला दुखावलेली होती. त्या रागातच तिने किशोर कुमार यांना होकार दिला
मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना दिलीप कुमार कधीच पसंत नव्हते असंही म्हटलं जातं