Pranali Kodre
भारतात सध्या दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धा खेळली जात आहे. ही स्पर्धा इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशा चार संघात खेळली जात आहे.
खरंतर पूर्वी ही स्पर्धा विभागीय पद्धतीने म्हणजे पूर्व,पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य अशा संघात खेळली जायची. परंतु, आता ही पद्धत बदलण्यात आली आहे.
याबरोबरच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या स्पर्धेत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी नाही.
असं असल्याने नक्की विजेता कसा ठरवणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
तर स्पर्धेच्या स्वरुपानुसार चारही संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळणार आहेत.
त्यामुळे तीन फेऱ्यामध्ये हे सामने खेळून पूर्ण होतील, म्हणजेच प्रत्येक संघ एका फेरीत एक असे एकूण तीन सामने खेळतील.
या तीन फेऱ्यांनंतर ज्या संघाचे सर्वाधिक पाँइंट्स मिळवणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात येणार आहे.
डावाने किंवा १० विकेट्सने विजय - ७ पाँइंट्स
चौथ्या डावानंतर विजय- ६ पाँइंट्स
अनिर्णित सामना, पण संघाची पहिल्या डावात आघाडी - ३ पाँइंट्स
अनिर्णित सामना, पण संघाला पहिल्या डावात पिछाडी - १ पाँइंट्स
पराभूत संघ - शून्य पाँइंट्स