Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्रावो याने कॅरिबियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ब्रावोने २०२३ मध्ये आयपीएल (IPL) मधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने सीएसके संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपले काम सुरु केले होते.
जगभरामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आलेल्या ब्रावोने आपल्या ट्वेंटी-२० कारकिर्दीचा शेवटचा सामना कॅरिबियन लोकांसमोर खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या वेस्ट इंडिज येथे कॅरिबियन प्रीमियर लीगचा ११ वा हंगाम सुरु आहे. या हंगामामध्ये ड्वेन ब्रावो त्रिनबागो नाईट रायडर्स कडून खेळत आहे.
ब्रावो सीपीएलमधून निवृत्ती घेताना म्हणाला, "आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला. हा माझा शेवटचा हंगाम असून मी सीपीएलमधून निवृत्ती जाहीर करतो. मी माझा शेवटचा सामना माझ्या कॅरिबियन लोकांसमोर खेळून माझ्या ट्वेंटी-२० क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करायचा आहे. माझा हा प्रवास मला सुरुवातीपासून शेवट्पर्यंत मदत करणाऱ्या माझ्या त्रिनबगो नाईट रायडर्स टीममध्ये समाप्त होईल!"
ब्रावोने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये १०३ सामन्यांमध्ये सर्वाधिक १२८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ११५५ धावा केल्या आहेत.
याबरोबरच ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असून त्यातील तीन वेळा त्याने कर्णधार म्हणून विजेतेपद मिळवले आहे.