अंकिता खाणे (Ankita Khane)
पृथ्वीला सुर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात, ज्याला आपण एक वर्ष म्हणतो. तर स्वतः भोवती प्रदक्षिणा पूर्ण करायाला २४ तास म्हणजे एक दिवस लागतो असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
पण तुम्हाला माहित आहे का, की हे एक मिथक आहे. पृथ्वीशी निगडित असे अनेक मिथक आहेत ज्याविषयी dainikbhaskar.com ने दिलेल्या वृत्तानुसार आपण जाणून घेऊया.
अमेरिकेत १९७० मध्ये पर्यावरणाशी निगडीत मुद्द्यांवर जागरुकता आणण्यासाठी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने अर्थ डे ची सुरुवात केली. यासाठी त्यांनी कँपेन चालवलं होतं.
यामुळे २२ एप्रिलला संपूर्ण अमेरिकेतून २ कोटी लोक रस्त्यावर उतरले. आजवर या कँपेनने १८४ दोशात ५००० एन्व्हॉर्मेंटल ग्रुप्स जोडले गेले आहेत.
एका दिवसात २४ तास - नाही एका दिवसात २३ तास, ५६ मिनीटं आणि ४ सेकंदाचा असतो. एवढ्या वेळातच पृथ्वी आपल्या स्वतः भोवती फिरते.
पृथ्वीवर विज कधीकधीच पडते - नाही तर एका सेकंदात १०० वेळा किंवा एका दिवसात ८६ लाख वेळा सुद्धा विज पडते.
पृथ्वीच्या ७० टक्के भागावर पाणी आहे - पृथ्वीच्या वस्तुमानाच्या फक्त ०.०७ टक्के आणि त्याच्या खंडाच्या ०.४ टक्के भागावर पाणी आहे.