बनावट जिरे ओळखण्याची सोपी पद्धत

सकाळ डिजिटल टीम

जिरा हा मसाल्यातला पदार्थ प्रत्येकाच्या घरात असतो

परंतु आजकाल हाच जिरा बनावट पद्धतीने बनवला जातोय

अशा जिऱ्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो

प्रत्येकाने घरी हा प्रयोग केला तर बनावट जिरे ओळखले जाऊ शकतात

बनावट जिरे पाण्यात टाकले तर ते मळकट रंगाचे दिसतात आणि पाणीही गढूळ होते

अस्सल जिरे पाण्यात टाकले तर ते स्वच्छ आणि पिवळसर रंगाचे दिसतात

या पद्धतीनुसार तुमच्या मसाल्याच्या डब्यातल्या जिऱ्याची टेस्ट करु शकता

मागे पालघरमध्ये लाखो रुपयांचे बनावट जिरे पोलिसांनी जप्त केले होते