रिकाम्या पोटी ही फळं खाणं आरोग्यासाठी ठरतील वरदान!

साक्षी राऊत

फळांचे सेवन करणे हे शरीरासाठी पोषक असते. त्यात अनेक महत्वाची जीवनसत्व असतात जे आपला अनेक गंभीर आजारांपासून बचाव करतात. चला तर आज आपण रिकाम्या पोटी फळे खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

Fruits For Health

सफरंचद

यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंटची मात्रा भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते. तेव्हा रिकाम्या पोटी एक सफरचंद खाणे फायद्याचे ठरेल.

Fruits For Health

केळी

यात पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि फायबरची जास्त मात्रा असते. ज्यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते.

Fruits For Health

द्राक्ष

द्राक्षात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर अँटीऑक्सिडंट्सची मात्राही भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची इम्युन सिस्टिम मजबूत होते आणि हाडांचे आरोग्यही चांगले राहते. रोज रिकाम्या पोटी या फळाचे सेवन आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते.

Fruits For Health

पपई

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पचनशक्ती वाढवणारे एन्झाइम्स असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी या फळाचे सेवन केल्याने पोटाचे विकारही दूर होतात.

Fruits For Health

डाळिंब

या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी डाळिंब खाल्ल्याने व्हायरल इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो.

Fruits For Health

ही फळं रोज रिकाम्या पोटी खाल्ल्यास अनेक आजारांपासून तुमचा बचाव होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fruits For Health