Saisimran Ghashi
बीट शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
बीटापासून हलवा,सरबत आणि अनेक पदार्थ बनवता येतात.
पण असे म्हंटले जाते की बीट कच्चे खाल्ल्यास शरीरात रक्तवाढ होण्यास मदत होते.
तर बीट खाल्ल्याने खरोखरच रक्त वाढते की हे एक मिथ्य आहे जाणून घेऊया
आरोग्य तज्ञांच्या मते बिटामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते.
शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी लोह सर्वात आवश्यक पोषक तत्व आहे लोहाशिवाय लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाहीत.
शरीरात रक्त कमी असल्यास श्वास घेण्यात त्रास होणे थकवा जाणवणे हे लक्षणे दिसतात.
आरोग्य तज्ञांच्या मते बीटामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते ज्यामुळे शरीरात रक्त वाढ होण्यास मदत मिळते.
त्याचबरोबर बीट हे उच्च रक्तदाब, पचनशक्ती आणि चमकदार त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.