पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्याने आरोग्याला मिळतात भरपूर फायदे.!

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

पावसाळ्यात आपल्याला तळलेले खाद्यपदार्थ आणि भाजलेला मका खायला आवडतो.

मका

मका आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

भाजलेले मक्याचे कणीस

भाजलेले मक्याचे कणीस खायला सगळ्यांनाच आवडते. हे चवदार कणीस खाण्याचे आरोग्याला काय फायदे होतात? चला तर मग जाणून घेऊयात.

पोषकघटक

मक्याच्या कणीसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन ए, फोलिक अ‍ॅसिड इत्यादी पोषकघटकांचा समावेश असतो.

पचनाच्या समस्या दूर होतात

पावसाळ्यात मक्याचे भाजलेले कणीस खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचेसाठी प्रभावी

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्याने त्वचेवरील रॅशेस दूर होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो

मक्यामध्ये फायबर आणि जीवनसत्वांचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, भाजलेले मक्याचे कणीस खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

गरोदरपणात चमकदार त्वचेसाठी दीपिका लावते 'हा'आयुर्वेदिक फेसपॅक

Deepika Padukone Skincare | esakal
येथे क्लिक करा.