मीठ खा..पण प्रमाणात! जास्त मीठ खाल्ल्याने उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या

Manoj Bhalerao

शरीराला सोडियम आवश्यक असते. ते मिठातून मिळते. त्यामुळे आहारातून मीठ पूर्णपणे वर्ज्य करू नये. विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती किंवा रक्तदाब, तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

शरीरातील द्रव पदार्थ व इलेक्ट्रॉलाइडस् यांच्यातील समतोल राहण्यासाठी सोडियम आवश्यक असते. त्यामुळे मीठ खा, पण प्रमाणातच, असा सल्ला डॉक्टर देतात.

मिठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम व पोटॅशियम असते. आपण खातो, त्या मिठात सोडियमचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाण्याची सवय असणारांनी ती हळूहळू कमी करावी. अचानक मीठ खाणे बंद करू नये.

शिजविलेल्या अन्नातून मीठ खाणे ठिक, पण भाजीत वरून मीठ घेऊ नये. मिठाचे प्रमाण संतुलित हवे. डब्ल्यू. एच. ओच्या अहवालानुसार एका व्यक्तीने दिवसभरात पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे.

अधिक खाल्ल्यास ह्दयरोगाचा धोका उदभवू शकतो. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहारातील ७५ टक्के मीठ प्रोस्टेट फूड आणि बाहेर तयार केलेल्या अन्नातून येते. एका सर्व्हेनुसार भारतातील लोक रोज किमान ११ ग्रॅम मीठ खातात.

असे टाळा मीठ

बाहेरील जंकफूड, स्नॅक्स, आधीच शिजविलेले, बंद पाकिटातून देणारे पदार्थ, मोनोसोडियम ग्लूटामेट किंवा मीठ असलेले पाकीटबंद खाद्य पदार्थ टाळावेत. भाजीला चव येण्यासाठी मिठाऐवजी मसाले व गंध असणाऱ्या वनस्पतींचा समावेश वाढवावा. आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवावे. फळे खाताना त्यावर मीठ वापरू नये.

यामध्ये मीठ अधिक

पिझ्झा, बर्गरमध्ये, पाकीटबंद मसाले, खाद्य पदार्थ

रेडिमेड सॉस, सूप, खारवलेले मांस, प्रिझर्वेटीव्ह

वेफर्स, फ्राइड नट्स, पॉपकॉर्न

जास्त मिठाचे दुष्परिणाम

हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाबाचा धोका.पोट फुगणे, अपचन, गॅस तयार होणे ,किडनीस्टोनचा धोका अधिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.