सकाळ डिजिटल टीम
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
ॲन्टीऑक्सिडंटने समृद्ध असलेला पेरू शरीराला जीवनसत्त्वे ए, सी आणि के प्रदान करतो. जाणून घ्या रिकाम्या पोटी पेरू खाण्याचे फायदे..
पेरूच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. यामुळे शरीरात बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो आणि शरीर निरोगी राहते. याच्या सेवनाने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण वाढते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
यात सूक्ष्मजंतूविरोधी गुणधर्म आढळतात, जे हानिकारक सूक्ष्मजंतूंच्या प्रभावापासून आतड्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचनशक्ती वाढते आणि अतिसाराचा धोका कमी होतो.
पेरूमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे चयापचय सुधारते. शरीरात कॅलरीज जमा होण्याचीही समस्या टाळते.
सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे ते पचायला वेळ लागतो, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे उत्सर्जन मर्यादित होते.
पेरूमध्ये पोटॅशियम आणि विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने शरीरावरील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. शिवाय, शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते.