सकाळ डिजिटल टीम
सोडियम, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन सी असे अनेक प्रकारचे पोषक तत्व दुधामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
रोज एक ग्लास दूध पिल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.
मात्र, दूध प्यायल्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी खाणे आणि पिणे टाळावे, अन्यथा ते तुमचे गंभीर नुकसान करू शकते.
दुधासोबत लिंबू, संत्री यासारखी आंबट फळे खाणे हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते आणि तुम्हाला उलट्या, जुलाब सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक, दूध पचायला वेळ लागतो, त्यामुळे आंबट फळे खाल्ल्याने पोटदुखी किंवा उलट्या होऊ शकतात.
मासे खाण्यापूर्वी किंवा नंतर दूध पिऊ नये, असे अनेकदा तुम्ही ऐकले असेल. वास्तविक, मासे आणि दूध या दोन्हीमध्ये प्रथिने भरपूर असतात. अशा परिस्थितीत, ते एकत्र खाल्ल्याने पचन बिघडू शकते आणि तुम्हाला उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या गंभीर समस्या होऊ शकतात.
दूध आणि दही एकत्र सेवन करणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते, या दोन गोष्टी एकत्र कधीही सेवन करू नये. दही आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब अशा समस्यांना सामोरे जावे लागते.
साधारणपणे दूध आणि केळी हे एकत्र सर्वोत्तम मिश्रण मानले जाते, तरी काही लोकांसाठी ते फायदेशीर नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्यांना गॅस किंवा ब्लोटिंग सारख्या पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी दूध आणि केळी एकत्र सेवन करू नये. कारण, ते पचायला खूप वेळ लागतो.
अनेकजण दुधासोबत गुळाचेही सेवन करतात. पण, आयुर्वेदात हे मिश्रण निषिद्ध मानले गेले आहे. खरं तर, हे एकत्र खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते आणि तुम्हाला इतर अनेक गंभीर समस्या देखील होऊ शकतात.
(हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कृपया कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)