सकाळ डिजिटल टीम
अनेकांना दुपारी जेवल्यानंतर झोप येते आणि ते दुपारच्या वेळेत १-२ तास झोपतात. पण, दुपारच्या झोपेचा शरीरावर काय परिणाम होतो ? यावर तज्ञांचे मत जाणून घेऊयात.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराला आराम देण्यासाठी दुपारी अर्ध्या तासाची झोप घ्यावी. पण, अर्ध्या तासापेक्षा जास्त झोप घेतल्यास आपल्याला विविध आजार होण्याची शक्यता असते.
दुपारी जास्त वेळ झोपल्याने बीएमआय, रक्तदाब वाढणे, हृदयाच्या समस्या आणि मधुमेह होऊ शकतो.
दुपारी जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो.
दीड तासापेक्षा जास्त झोपल्यास लकव्याची शक्यता जास्त असते.
शरीरासाठी रात्री ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. मात्र, दुपारी ३० मिनिटांची झोप घेतल्यास थकवा नाहीसा होतो, शरीर ताजेतवाने वाटते.
दुपारी जास्त झोपल्यास, रात्री झोप लागत नाही व त्यामळे दिवसभराचा दिनक्रम बदलतो.
दुपारी झोपायची सवय लागल्यास व्यक्तीमध्ये आळसपणा येतो.