सकाळ डिजिटल टीम
अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे; पण अंड्याचा कोणता भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो.
प्रथिनासोबतच संपूर्ण अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये निरोगी फॅट्स आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
अंड्याचा पिवळा भाग पोषणासाठी खूप चांगला असतो.
पांढऱ्या भागाबद्दल बोलायचं झालं तर, यातून तुम्हाला प्रथिने मिळतात.