Chinmay Jagtap
एकनाथ खडसे यांचा जन्म 2 सप्टेंबर 1952 रोजी झाला. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आहेत. २०१९ पर्यंत सलग सहा वेळा मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार होते.
एकनाथराव खडसे 1987 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते.
खडसे यांनी 1980च्या दशकात भाजपचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. यावेळी यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया मजमुत केला
१९९५ - १९९९ दरम्यान युती शासनाच्या काळातते वित्त आणि सिंचन खात्याची जबाबदारी सांभाळली होती.
खडसे यांनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. त्यांचा यशस्वी कार्यकाळामुळे त्यांनी २०१४मध्ये भाजपला विजय मिळवून दिला
2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा केली
खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांची या पदासाठी निवड करण्यात आली.
2016मध्ये खडसे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले. ते १२ खात्यांचे मंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या यादीतून खडसेंचे नाव वगळले. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.