Anuradha Vipat
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तुलसी विरानीची भूमिका भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी साकारली होती.
एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांना ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तुलसीची भूमिका कशी मिळाली होती हे सांगितलं होतं
स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, एका ज्योतिषामुळे त्यांना ही भूमिका मिळाली होती. आधी माझी निवड दुसऱ्या भूमिकेसाठी झाली होती पण ज्योतिषाच्या बोलण्यानंतर एकताने मला तुलसी विरानीच्या भूमिकेसाठी घेतलं होतं
आता एकताने स्मृती इराणी यांचा हा दावा खोटं असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे
स्मृती इराणी यांची या भूमिकेसाठी निवड कशी झाली हे सांगणारा व्हिडीओ एकता कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
हे खोटं आहे.!!! मोनिशा, तुझी ऑडिशन मिळाली, ती आम्ही पाहिली आणि एका सेकंदात तुला या भूमिकेसाठी निवडलं असं एकताने म्हटले आहे