Anuradha Vipat
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ALT बालाजीच्या 'गंदी बात' या वेब सीरिजच्या एका एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असलेली दृश्ये दाखवली गेली आहेत
आता प्रकरणी त्यांच्याविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोर्नोग्राफिक कंटेंटसाठी अल्पवयीन मुला-मुलींचा वापर केल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
2019 मध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये मृत्युदंडासह अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली.
एकता कपूरवर POCSO कायद्याच्या कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सीझन 6 शी संबंधित हे प्रकरण आहे.