पुढील वर्षी भारतात कोणत्या इलेक्ट्रिक कार लाँच होणार? पाहा यादी

Sudesh

इलेक्ट्रिक कार

भारतात इलेक्ट्रिक कारचं मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.

2024 Electric Cars | eSakal

ईव्ही

यामुळेच कित्येक कंपन्या देशात नवनवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. देशात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढणे हेदेखील याचं कारण आहे.

2024 Electric Cars | eSakal

ह्युंडाई

2023 च्या सुरुवातीला ह्युंडाई कोना गाडी लाँच करण्यात आली होती. याचं इलेक्ट्रिक व्हर्जन पुढील वर्षी लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.

2024 Electric Cars | eSakal

टाटा

टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीचं इलेक्ट्रिक व्हर्जन येणार असल्याचं कंपनीनेच स्पष्ट केलं आहे. याचं डिझाईन नेक्सन ईव्हीप्रमाणे असण्याची शक्यता आहे.

2024 Electric Cars | eSakal

पंच ईव्ही

टाटा पंच इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे 12 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. जानेवारी 2024 मध्ये ही कार लाँच होऊ शकते.

2024 Electric Cars | eSakal

टाटा कर्व्ह

टाटा आपली पहिली कूप एसयूव्ही इलेक्ट्रिक कार 'कर्व्ह' ही पुढील वर्षी लाँच करू शकते. याची संभाव्य किंमत 20 लाख रुपये आहे.

2024 Electric Cars | eSakal

टाटा हॅरिअर

टाटाची हॅरिअर ही तगडी एसयूव्ही भरपूर लोकप्रिय आहे. पुढील वर्षी या गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केलं जाऊ शकतं.

2024 Electric Cars | eSakal

हॅरिअर ईव्ही

2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये हॅरिअर इलेक्ट्रिकचं कन्सेप्ट मॉडेल सादर केलं होतं. 2024 च्या अखेरपर्यंत ही कार लाँच होऊ शकते. याची संभाव्य किंमत 30 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2024 Electric Cars | eSakal