Amit Ujagare (अमित उजागरे)
राज्याचा अंतरिम बजेट आज जाहीर झालं, यामध्ये दुर्बल घटकांसाठी काही योजना जाहीर झाल्या आहेत.
यामध्ये दिव्यांगाना इलेक्ट्रिक वाहनांचं वाटप करण्यात येणार आहे.
पान-मुसळीचं उत्पादन घेणाऱ्या बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
दिव्यांगांसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना, पहिल्या टप्प्यात ३४,४०० घरं बांधणार
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसंच वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ
रमाई, शबरी, आदिम, पंतप्रधान आवास योजनेतून येत्या ५ वर्षात ३५ लाख ४० हजार ४९१ घरं बाधणार
तृतीयपंथीयांना शासकीय भरतीत स्वतंत्र जेंडरचा पर्याय उपलब्ध, शासकीय योजनांचा लाभ घेणं सुलभ ठरणार
मौलाना आझाद विकास महामंडळाकडून कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटींहून ५०० कोटींपर्यंत वाढवली.