Swadesh Ghanekar
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा इंग्लंडच्या नावावर आहे, तर आयर्लंड, अफगाणिस्तान हे सर्वात शेवटच्या बाकावर आहेत.
आयर्लंड आणि अफगाणिस्तान या देशांच्या नावावर कसोटीत प्रत्येकी ४ शतकं आहेत.
झिम्बाब्वे ( ६४) व बांगलादेश ( ७९) हे संघ सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमांत अनुक्रमे १० व नवव्या क्रमांकावर आहेत.
श्रीलंका ( ३०१), न्यूझीलंड ( ३३१) आणि दक्षिण आफ्रिका ( ३९२) या संघांनी कसोटीत तीनशेपार शतकं झळकावली आहेत
पाकिस्तान संघ सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या देशांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजचा संघ पाचशेपार शतक करणाऱ्या चार देशांपैकी एक आहे.
भारतीय संघ या विक्रमात ५४६ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटीतील सर्वाधिक शतकाच्या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचे या विक्रमात राज्य आहे. त्यांनी ९१९ शतकं झळकावली आहेत.