सकाळ डिजिटल टीम
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आवडीने.. हे आहेत जयेश महाराज भाग्यवंत..किर्तनातुन अटकेपार आपल्या विठुचा झेंडा लावणारे...
इंग्रजी भाषेत कीर्तन करून वारकरी संप्रदायाचा जागतिक स्तरावर विकास व्हावा . यासाठी प्रयत्न करणारा हा युवक मुळचा कल्याण चा असलेला सध्या स्थायिक डोंबिवली आहे.
जयेश महाराजांच शिक्षण हे इंग्लिश मेडियम मधून झालेलं असून त्यांच इंजिनिअरिंग देखील झालेल आहे .
आय टी सेक्टर मध्ये जॉब आणि एकीकिडे आध्यात्मिकतेची ओढ...ते उत्तम रित्या इंग्लिश मध्ये कीर्तन , भागवत कथा करतात. आपली संस्कृती जपण्याचा ते पूर्ण पणे प्रयत्न करत असतात.
वारकरी संप्रदाय हा सर्व सामान्य समाजाला जोडून ठेवणारा एक दुवा आहे. लहान थोर घेऊन चालू पंढरीची वाट' सर्वाना स्वत : मध्ये सामावून घेणारा वारकरी संप्रदाय हा एका आय टि मधील् तरुणाला का संधी देणार नाही.
संताचे साहित्य अभंग हे फक्त महाराष्ट्रा पुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक इंग्रजी माणसाला त्या अभंगाचा अर्थ कळावा यासाठी ते प्रयत्न करत राहतात.. तसेच नवीन पिढीला आपली संकृती कळावी हरीनामची गोडी लागावी हा एकच उद्देश.
त्यांना या क्षेत्रात 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तसेच त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील हाती घेतलेले आहेत.
आय टी सेक्टर आणि इंग्रजी कीर्तन याचा सुरेख संगम त्यांच्या वागण्यातून दिसून येतो. बोल्ड बिनधास्त आणि स्टायलिश असा हा तरुण नवीन येणाऱ्या पिढीला आणि बाहेरील लोकाना कीर्तना कडे वळवण्याचा मार्ग दाखवत आहे.
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई पती सोयरिया...खूप कौतुक.. काळाची गरज आहे...
तुकाराम म्हणे लाभ होय तो व्यापार l
करा काय फार शिकवावे l l
Tukaram maharaj say, what to teach you a lot ? Better you do something that will Benefit you, that the best for you.. Don't do anything that will cause you destruction.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.