Saisimran Ghashi
रामेश्वरम (भारत) आणि मन्नार बेट (श्रीलंका) यांच्या दरम्यान समुद्रात रामसेतु नावाचा अद्भुत सेतु आहे.
रामायणानुसार, भगवान राम आणि त्यांच्या वानरांच्या सैन्याने लंकेवर प्रवास करण्यासाठी हा सेतु बांधला होता.
युरोपियन स्पेस एजन्सीने रामसेतुची उपग्रह चित्रे शेअर केली आहेत. यातून 48 किलोमीटर लांबीचा हा सेतु दिसत आहे.
15 व्या शतकापर्यंत रामसेतुवरून चालत जाणे शक्य होते. समुद्राच्या तडाख्यामुळे नंतर हा मार्ग अनेक ठिकाणी खंडित झाला.
रामसेतु हा पुरातन काळातील एक अद्भुत स्थापत्यकला आणि अभियांत्रिकीचा नमुना आहे.
सेतुसमुद्रम शिपिंग कॅनॉल प्रकल्पामुळे या पुलाच्या काही भागांना तोडण्याची योजना आखली होती. यामुळे पुरातत्व आणि पर्यावरणीय चिंता व्यक्त झाल्या.
रामसेतु हा भारतासाठी अभिमानाची बाब आहेच आणि संपूर्ण जगासाठी देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.