Anuradha Vipat
साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची कारकीर्द सध्या शिखरावर आहे.
ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी 'देवरा' या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
दरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या 'देवारा' चित्रपटाच्या ओटीटी अधिकारांबाबत काही बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ज्युनियर एनटीआरच्या 'देवारा' चित्रपटाचे ओटीटी अधिकार मोठ्या प्रमाणात खर्च करून विकत घेतले आहेत.
हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या पाचही भाषांसाठी ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत. यासाठी नेटफ्लिक्सने 155 कोटी रुपये खर्च केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.