रोहित कणसे
देशानुसार तारखा बदलत असल्या तरी जगभरात शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात हा दिवस 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
प्रचीन काळापासून, गुरूंना भारतीय संस्कृतीत आदराचे स्थान आहे, आपल्या पौराणिक कथांमध्ये देखील अनेक नामांकित शिक्षक आणि गुरू होऊन गेले आहेत, ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय पौराणिक कथांमधील सर्वात प्रसिद्ध शिक्षक कोणी असेल तर ते द्रोणाचार्य आहेत. ते महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असून त्यांनी कौरव आणि पांडव या दोघांनाही युद्धकलेची शिकवण दिली, अर्जुन हा त्यांचा आवडता विद्यार्थी होता.
भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम हे पृथ्वीवरून क्षत्रिय जातीचा वारंवार नायनाट करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी फक्त ब्राह्मणांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. क्षत्रिय असूनही महाभारतातील सुप्रसिद्ध पात्र कर्णाला परशुरामाचे मार्गदर्शन मिळाले होते.
विश्वामित्र हे एक ऋषी होते जे त्यांच्या रागीट स्वभावासाठी आणि अफाट शक्तीसाठी ओळखले जातात. भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांचे गुरु म्हणून देखील त्यांना ओळखले जाते .
ऋषी वेद व्यास हे महाभारत महाकाव्याचे लेखक म्हणून ओळखले जातात. पांडव आणि कौरवांचे आजोबा या नात्याने, वेद व्यास यांनी महाभारत महाकाव्यातील महत्वाच्या प्रसंगी प्रमुख पात्रांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आणि सल्ला दिला.
हिंदू पौराणिक कथांमध्ये, ऋषी वशिष्ठ हे सात महान ऋषींपैकी एक म्हणून ओळखले जातात. वशिष्ठ यांना धर्मसूत्र, वशिष्ठ संहिता, अग्नी पुराण, योग वशिष्ठ आणि विष्णु पुराण यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन करण्याचे श्रेय दिले जाते.
रामायण रचण्यासाठी प्रसिद्ध ऋषी वाल्मिकी यांनी भगवान रामाच्या जुळ्या मुलांचे, लव आणि कुश यांचे शिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शुक्राचार्य हे भृगु ऋषींचे पुत्र आणि भगवान शिवाचे एकनिष्ठ उपासक होते, असुरांचे गुरु म्हणून त्यांना ओळखले जाते. महाभारतात, त्यांना राज्यशास्त्र आणि रणनीतीचे ज्ञान देणारे भीष्म पितामह यांचे गुरू म्हणून दाखवण्यात आले आहे.
बृहस्पती देवांचे गुरु म्हणून ओळखले जातात इतकेच नाही थर ऋग्वेदात देखील त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्या विशेष धनुष्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या धनुष्याच्या दोरीला रत किंवा 'कॉस्मिक ऑर्डर' असे म्हटले जाते, त्यांनी धर्माच्या मुलभूत तत्वांना मूर्त रूप दिले असे म्हटले जाते.
तांदळाची भाकरी खाण्याचे फायदे