रोहित कणसे
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण दररोज सकाळी व्यायम करतात, तर काही लोक संध्याकाळी झोपण्याच्या आधी व्यायम करणे पसंद करतात.
पण रात्री व्यायम करणे योग्य आहे का? आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
दररोज सकाळी व्यायम केल्याले शरीर तंदरुस्त होते यासोबतच शरीरात एनर्जी देखील येते, पण व्यायम संध्याकाळी देखील केला जाऊ शकतो.
दिवसभराचा तणाव दूर करण्यासाठी तुम्ही रात्री देखील व्यायम करू शकता, यामुळे डोक्यावरील ताण कमी होईल आणि चांगली झोप देखील लागेल .
काही लोक संध्याकाळच्या वेली शारीरिकरित्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. त्यामुळे त्यांची रात्रीच्यावेळी सहनशक्ती, स्नायूंची ताकद आणि लवचीकता देखील चांगली असते.
रात्री झोपण्याच्या काही तास आधी व्यायम केल्याने शरीराला त्याचे भरपूर फायदे होतात, यामुळे तुमचे कमरेचे दुखणे देखील कमी होईल.
डॉक्टर देखील सकाळी किंवा संध्याकाळी एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात, दोन्ही वेळा व्यायम केल्याने तुमचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
संध्याकाळी व्यायम करणे अशा लोकांसाठी फायदेशीर असते जे सकाळी कामवर जातात, अशा लोकांना संध्याकाळी व्यायम केल्याने रिलॅक्स वाटेल.
रात्री कधीच हेवी व्यायम करू नये, असे केल्याचे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते, त्यामुळे संध्याकाळी नेहमी लाइट व्यायम करा.
निक्कीला कसा पार्टनर हवाय? स्वत:च केला खुलासा