सकाळ डिजिटल टीम
हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश असणं हे डोळ्यांबरोबरच शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. ब्रोकोलीसह अन्य हिरव्या भाजाही यासाठी गुणकारी ठरू शकतात.
संत्री, मोसंबी यांसारखी फळे तसेच द्राक्षे, किवीसारखी अन्यही आंबट-गोड चवीची फळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. या फळांमध्ये 'अ' व 'ई' जीवनसत्त्वे असतात.
डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुकामेवा आहारात समाविष्ट करणे लाभदायक ठरतं. अक्रोड, काजू, बदाम, चिया सिड्स, फ्लॅक्स सिड्स आणि हेम्प सिड्सही लाभदायक ठरतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी मत्स्याहार देखील उपयुक्त ठरतो. टुना, सार्डिन, मॅकेरल, साल्मन आणि ट्राऊंटसारखे मासे आहारात असल्यास डोळ्यांना लाभ मिळतो.
दृष्टी सुधारण्यासाठी गाजराप्रमाणंच रताळीही उपयुक्त ठरतं. यामध्ये 'ई' जीवनसत्त्व, बीटा कॅरोटिन आणि काही गरजेची अँटिऑक्सिडंट्स असतात.