Monika Lonkar –Kumbhar
अनेक तरूणींना काजळ लावायला आवडते. परंतु, उन्हाळ्यात डोळ्यांना काजळ लावताना तुम्ही खास काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वात आधी काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांजवळचा भाग मिसेलर वॉटरच्या मदतीने स्वच्छ करून घ्या.
जर तुम्ही केवळ काजळच लावणार असाल तर आयशॅडो नव्हे तर डोळ्यांच्या पापण्यांवर प्रायमर लावा.
डोळ्यांच्या पापण्यांना कॉम्पॅक्ट पावडर किंवा व्हाईट आयशॅडोचा वापर करू शकता. हे लावल्यामुळे ड्राय बेस तयार व्हायला मदत होईल.
काजळ चुकूनही इनर कॉर्नरला लावू नका. अन्यथा काजळ फिस्कटू शकते.
काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांजवळ आयशॅडो लावून घ्या. त्यानंतर, हलक्या हाताने डोळ्यांना काजळ लावा.
डोळ्यांना काजळ लावल्यानंतर, आयलायनरचे कोटिंग करायला काही हरकत नाही.