Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतून न्यूझीलंड संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपल्यानंतर विलियम्सनने न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांचे नेतृत्व सोडले. त्याने यापूर्वीच कसोटीचे नेतृत्व सोडले होते.
त्यामुळे आता विलियम्सनची न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून कारकिर्द संपली. यासह फॅब-4 च्या नेतृत्वाच्या युगाचाही अंत झाला.
खरंतर क्रिकेटमध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन या चार दिग्गज समवयस्क क्रिकेटपटूंना सध्याच्या काळातील फॅब-4 म्हणून ओळखले जाते.
या चौघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच काळ फलंदाजीत चमकदार कामगिरी करण्याबरोबरच नेतृत्वही केलं. यातील विराट, स्मिथ अन् रुट यापूर्वीच नेतृत्वपद सोडले होते. आता विलियम्सनेही ही जबाबदारी आपल्या खांद्यावरून उतरवली आहे.
भारताच्या विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 213 सामन्यांत नेतृत्व केले. यातील 135 सामने जिंकले, तर 60 सामने पराभूत झाले. 3 सामने बरोबरीत सुटले, तर 11 सामने अनिर्णित राहिले, तसेच 4 सामने रद्द झाले.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 104 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यातील 55 सामने जिंकले, तर 39 सामने पराभूत झाले. 7 सामने अनिर्णित राहिले, तर 3 सामने रद्द झाले.
इंग्लंडच्या जो रुटने 64 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून 27 सामने जिंकले आहेत. 26 सामने पराभूत झाले आहेत. तसेच 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.
न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने 206 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यातील 107 सामन्यांत विजय मिळवला, 82 सामन्यांत पराभव स्विकारला. तसेच 2 सामने बरोबरीत सुटले, तर 8 सामने अनिर्णित राहिले. तसेच 5 सामने रद्द झाले. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 2021 मध्ये टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली.