Monika Lonkar –Kumbhar
आपली त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग दिसावी, यासाठी आपण किती प्रकारचे उपाय करतो.
अनेकदा महिला चमकदार त्वचेसाठी केमिकल्सनेयुक्त असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. परंतु,याने तात्पुरता फरक पडतो. तुम्ही घरच्या घरी काही गोष्टींपासून फेसपॅक बनवू शकता.
हा फेसपॅक बनवण्यासाठी एक पिकलेलं केळ स्मॅश करून घ्या.
या स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये मध घाला. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. आता चेहरा पाण्याने धुवा. चेहऱ्यावर सुंदर चमक येईल.
हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी काकडीचा रस आणि कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल एकत्र करा.
काकडी आणि कोरफडीची ही स्मूथ पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.
आठवड्यातून तीन वेळा हा फेसपॅक लावल्याने तुमची त्वचा वधूसारखी चमकेल.