Pranali Kodre
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी परत आली.
तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गटात खेळताना अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु, अंतिम फेरीपूर्वी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.
तिने यासाठी क्रीडा लवादाकडे दादही मागितली होती. परंतु, तिची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता ती भारतात परतली आहे.
या सर्व प्रकरणात तिच्या पाठीशी अनेक भारतीय उभे होतेच. त्याबरोबरच तिला कुस्तीपटू बजरंग पुनियानेही मोठा पाठिंबा दिला.
दरम्यान, अनेकांना हे माहित नसेल की बजरंग पुनिया आणि विनेश यांच्यात कौटुंबिक नातंही आहे.
बजरंग पुनियाचे लग्न संगीता फोगाट हिच्याशी झालं आहे.
संगीता फोगाट ही महावीर फोगाट यांची मुलगी असून कुस्तीपटू गीता, बबिता आणि रितू फोगाट यांची सख्खी बहिण आहे.
त्याचबरोबर विनेश फोगटची सख्खी चुलत बहिण आहे. त्यामुळे विनेश आणि बजरंग एकाच कुटुंबाचे भाग आहेत.