Raksha Bandhan Fashion: रक्षाबंधनासाठी ट्राय करा बॉलिवूड अभिनेत्रींचे हे साडी लुक, सर्वांची नजर तुमच्यावरच खिळेल

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा या साडीतील लुक खूपच सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारची एखादी साधी-सुंदर साडी आपण देखील रक्षाबंधनाच्या दिवशी नेसू शकता. 

Raksha Bandhan Fashion | Sakal

विद्या बालन

विद्या बालनचा हा लुक देखील आपण कॅरी करू शकता. अशा प्रकारच्या साडीवर कमीत कमी दागिने परिधान केल्यासही आपणास मोहक व आकर्षक लुक मिळेल. 

Raksha Bandhan Fashion | Sakal

जान्हवी कपूर 

तुम्हाला फिकट प्रकारचे रंग आवड असतील, तर जान्हवी कपूरचा हा लुक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. 

Raksha Bandhan Fashion | Sakal

करिश्मा तन्ना

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला एथनिक मॉर्डन लुक कॅरी करायचा असेल तर आपण करिश्मा तन्नाचा हा लुक कॉपी करू शकता. अशा पद्धतीच्या साड्या नेसायला देखील अतिशय कम्फर्टेबल असतात आणि सुंदरही दिसतात. 

Raksha Bandhan Fashion | Sakal

कृति सेनॉन

जर तुम्हाला एखादा साधा लुक कॅरी करण्याचा विचार करत असाल तर कृतिचा लुक कॉपी करू शकता. फुल स्लीव्ह्ज ब्लाउज आणि एम्ब्रॉयडर्ड बॉर्डर साडीमुळे तुम्हाला नक्कीच हटके लुक मिळेल.

Raksha Bandhan Fashion | Sakal

करीना कपूर

रक्षाबंधनादिवशी आपण एखादी शिमरी साडी लुक देखील कॅरी करू शकता. यासाठी आपण करीना कपूरच्या या लुकद्वारे नक्कीच काही आयडिया घेऊ शकता.

Raksha Bandhan Fashion | sakal

कंगना राणौत

कंगना राणौतप्रमाणे आपण देखील एखादी प्लेन पॅटर्न साडी नेसू शकता. या साडीवर आपण केवळ इअरिंग्ज जरी परिधान केले तरीही तुम्हाला हटके लुक मिळेल.

Raksha Bandhan Fashion | sakal

श्रद्धा कपूर

तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल तर श्रद्धा कपूरचा हा लुक तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Raksha Bandhan Fashion | sakal

यामी गौतम

यामी गौतमने नेसलेली ही साडी देखील अतिशय सुंदर आहे. अशा पद्धतीचे साडी नेसून त्यावर आपण अंबाडा हेअर स्टाइल केली तर नक्कीच आपल्याला आकर्षक लुक मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raksha Bandhan Fashion | sakal