Pranali Kodre
आयपीएल 2024 मध्ये 30 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सनरायझर्स हैदाराबाद 25 धावांनी पराभूत केले.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील हैदराबादच्या विजयात ट्रेविस हेडने शतक करत मोलाचा वाटा उचलला.
हेडने 41 चेंडूत 102 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने अवघ्या 39 चेंडूत शतक पूर्ण केले होते.
त्यामुळे हेडचे हे आयपीएल इतिहासातील चौथे सर्वात जलद शतक ठरले, तर 17 व्या हंगामातील सर्वात जलद शतक ठरले आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याता विक्रमक ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध बेंगळुरूला झालेल्या सामन्यात 30 चेंडूत शतक केले होते.
या यादीत गेलच्या पाठोपाठ युसूफ पठाण आहे. युसूफने राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध 2010 साली मुंबईला झालेल्या सामन्यात 37 चेंडूत शतक ठोकले होते.
तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलर असून त्याने 2013 साली किंग्स इलेव्हन पंजाबकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध मोहालीला झालेल्या सामन्यात 38 चेंडूत शतक केले होते.
चौथ्या क्रमांकावर हेड असून पाचव्या क्रमांकावर ऍडम गिलख्रिस्ट आहे. गिलख्रिस्टने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात 42 चेंडूत शतक केले होते.