Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर-8 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभूत केले.
भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला.
रोहितने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले.
रोहितने ही खेळी करताना 19 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा तिसरा खेळाडू ठरला.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर असून त्याने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक केले होते.
दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक केले होते.
दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुलसह संयुक्तपणे सूर्यकुमार यादव देखील आहे. त्यानेही 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक केले होते.
त्यानंतर रोहित शर्मा असून त्याच्यासह तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या गौतम गंभीर आहे. गंभीरने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक केले होते.