Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळरुविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला.
लखनऊच्या या विजयात क्विंटन डी कॉकने 81 धावांची खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
या खेळीदरम्यान डी कॉकने आयपीएलमध्ये 3000 धावाही पूर्ण केल्या. त्याने 99 डावात या 3000 धावा केल्या.
त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डीकॉक पाचव्या क्रमांकावर आला आहे.
या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने 75 डावात आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या होत्या.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केएल राहुलने 80 डावात 3000 आयपीएल धावा केल्या होत्या.
जॉस बटलर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 85 डावात 3000 आयपीएल धावा केल्या होत्या.
डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डू प्लेसिस संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी 94 आयपीएल डावात 3000 धावा केल्या होत्या.