सकाळ डिजिटल टीम
भारतीय संस्कृतीत उपवासाला विशेष महत्त्व आहे.
अनेकजण देवांच्या वार नुसार उपवास धरतात.
सहसा पुरुष शनिवार आणि महिला सोमवारी उपवास करतात. याशिवाय गुरुवारी आणि मंगळवारीही उपवास केला जातो. हे उपवास दर आठवड्याला केला जातो.
याशिवाय मासिक चतुर्थी, एकादशी,पौर्णिमेला काही लोक आवर्जून उपवास करतात.
सोबत सणवार, जयंती, देवांचे खास सण या दिवशीही उपवास केला जातो.
मुळात उपवासाला देवाची आराधना मानले जाते.
पण उपवास केल्याने देव प्रसन्न होतो, असे अनेकजण मानतात.
अशातच उपवास केल्याने आयुष्यातील कष्ट कमी होऊन आनंद सुख प्राप्त होतं, असाही समज आहे.
यात उपवास केल्याने जोडीदार चांगला मिळतो, असेही मानले जाते.
याशिवाय आरोग्याच्या दृष्टीने उपवास अत्यंत महत्त्वाचा असतो. एक दिवस काहीही न खाल्याने पोटाला आराम मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.