Father's Day : वडिलांना गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट गॅजेट्स

Sudesh

स्मार्टवॉच

आज फादर्स डे निमित्त तुम्ही आपल्या वडिलांना स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता. हार्ट-रेट मॉनिटर, स्टेप काऊंटर आणि आरोग्यासंबंधी असे अनेक फीचर्स वयोवृद्ध व्यक्तींसाठी फायद्याचे ठरतात.

Father's Day gifts | eSakal

किंडल

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या वडिलांना वाचनाची आवड असते. त्यामुळे वजनाला हलकं आणि स्वस्त असं किंडल हे त्यांच्यासाठी एक उत्तम गिफ्ट ठरू शकतं.

Father's Day gifts | eSakal

मोबाईल

अमेझॉनवर उपलब्ध असणारा Seniorworld Easyphone हा मोबाईल वृद्ध व्यक्तींसाठी अगदी फायद्याचा आहे. या मोबाईलमध्ये कॉलिंगसाठी फोटो बटन्स, कॉल ब्लॉकिंग, जीपीएस ट्रॅकर असे बरेच फीचर्स दिले आहेत.

Father's Day gifts | eSakal

मसाजर

वृद्ध व्यक्तींच्या तक्रारींपैकी सर्वात मोठी तक्रार म्हणजे अंगदुखी. त्यामुळेच तुम्ही तुमच्या वडिलांना बॅक मसाजर, फुट मसाजर किंवा मसाजर चेअर अशी एखादी गोष्ट नक्कीच गिफ्ट करू शकता.

Father's Day gifts | eSakal

की-फाईंडर

चाव्या हरवणे ही जवळपास सर्वच वृद्ध व्यक्तींची समस्या असते. यासाठी तुम्ही की-फाईंडर, अ‍ॅपल एअर टॅग किंवा जिओ टॅग अशा गोष्टीही गिफ्ट करू शकता. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी शोधण्यात त्यांना अडचण येणार नाही.

Father's Day gifts | eSakal

सारेगामा कारवां

तुमच्या वडिलांना जर गाणी ऐकण्याची आवड असेल, तर सारेगामाचं कारवां हे त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट ठरेल. यामध्ये एक रेडिओ आणि सुमारे पाच हजार प्रीलोडेड जुनी गाणी मिळतात.

Father's Day gifts | eSakal

टीव्ही

तुमच्या वडिलांना जर सिनेमा, मालिका किंवा खेळांचे सामने पाहण्याची आवड असेल, तर एक मोठ्या स्क्रीनचा टीव्ही हा त्यांच्यासाठी बेस्ट गिफ्ट ठरेल.

Father's Day gifts | eSakal

एअर प्युरीफायर

सध्या हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा त्रास तुमच्या वडिलांना होऊ नये, यासाठी तुम्ही एक एअर प्युरीफायर त्यांना गिफ्ट करू शकता.

Father's Day gifts | eSakal

व्हॉईस असिस्टंट स्पीकर

तुमच्या वडिलांना जर टेक्नॉलॉजी आवडत असेल, तर तुम्ही गुगल किंवा अमेझॉनचं व्हॉईस असिस्टंट स्पीकर त्यांना गिफ्ट देऊ शकता.

Father's Day gifts | eSakal

स्मार्ट स्केल

वाढत्या वयात वजनावर नियंत्रण ठेवणंही गरजेचं असतं. तुम्ही यासाठी आपल्या वडिलांना एक स्मार्ट स्केल गिफ्ट करू शकता. यामध्ये वजनासोबत शरीरातील फॅट, पाण्याची पातळी अशा बऱ्याच गोष्टी समजतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day gifts | eSakal