Sudesh
फेरारीने भारतात आपली पहिली 4-डोअर मॉडेल Purosangue भारतात लाँच केली आहे.
या कारची एक्स-शोरूम किंमत ही तब्बल 10.5 कोटी रुपये आहे.
फेरारीची ही कार ब्लॅक, ब्लू, येलो, व्हाईट, ग्रे आणि लाल रंगाच्या तीन शेडमध्ये उपलब्ध आहे.
फेरारीने या कारसाठी रंगांचे इतर पर्यायही उपलब्ध केले आहेत, मात्र त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.
पुरोसांग्यू कारची किंमत ही भविष्यात वाढणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे सध्या या कारचं बुकिंग बंद आहे.
या कारमध्ये ट्विन टर्बोचार्ज्ड V8 इंजिन वापरलं आहे. याची पॉवरट्रेन अधिक आकर्षक आणि दमदार आहे.
स्पोर्ट्स कार बनवणाऱ्या कंपनीने तयार केलेली ही कार अगदीच प्रॅक्टिकल देखील आहे. याचा ग्राऊंड क्लिअरन्स देखील भरपूर आहे.
या कारसोबत एक बेसिक फीचर्स लोडआउट मिळतं. यात फ्लँकवर फेरारी शील्ड, अपग्रेडेड व्हील्स, पेंडेड ब्रेक कॅलिपर्स, काँट्रास्ट स्टिचिंग, सस्पेंशन लिफ्ट फंक्शन अशा गोष्टी मिळतात.